एक्स्प्लोर

Yogi Prahlad Jani | 76 वर्षांपासून अन्नपाण्याविना राहणाऱ्या योगी प्रह्लाद जानी यांचं निधन

76 वर्षांपासून अन्नपाण्याविना राहणाऱ्या योगी प्रह्लाद जानी ( Yogi Prahlad Jani) यांचं निधन झालं. योगी प्रह्लाद जानी यांचा दावा होता की त्यांनी 76 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अन्न-पाणी ग्रहण केलेलं नव्हतं.

अहमदाबादः योगी प्रह्लाद जानी उर्फ चुनरीवाला माताजी (Chunariwala Mataji) यांचं मंगळवारी निधन झालं.  गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील चराडा गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते  90 वर्षांचे होते. जानी यांचा पार्थिव देह बनासकांठा जिल्ह्याच्या अंबाजी मंदिराजवळ त्यांच्या आश्रमात ठेवण्यात आला असल्याची माहिती आहे.  योगी प्रह्लाद जानी यांचा दावा होता की त्यांनी 76 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अन्न-पाणी ग्रहण केलेलं नव्हतं. गुजरातमध्ये मोठ्या संख्येने त्यांचे अनुयायी आहेत. विना अन्न-पाणी राहणाऱ्या योगी प्रह्लाद यांच्या दाव्यासंदर्भात शास्त्रज्ञांनी 2003 आणि 2010 मध्ये अभ्यास देखील केला होता. योगी प्रह्लाद यांचा दावा होता की, त्यांना अन्न-जल ग्रहण करण्याची गरज नाही कारण देवी मां ने त्यांना जीवंत ठेवलं आहे. त्यांच्या शिष्यांनी सांगितलं की, 'माताजी यांनी काही दिवसांआधी आपल्या मूळ स्थानावर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळं त्यांना त्यांच्या गावी चराडा इथं घेऊन गेलो होतो. त्यांनी तिथंच शेवटचा श्वास घेतला. आज त्यांच्या आश्रमात त्यांचा पार्थिव देह ठेवला जाईल. उद्या, गुरुवारी आश्रमातच त्यांना समाधी दिली जाईल.' योगी जानी यांची देवी मां अंबेवर खूप श्रद्धा होती. त्यामुळं ते नेहमी चुनरी परिधान करायचे. त्यामुळं ते चुनरीवाला माताजी या नावाने देखील परिचित होते. त्यांचा दावा होता की, आई अंबेची माझ्यावर अपार कृपादृष्टी आहे. आईच्या कृपेने माझ्या टाळूतून एका द्रव्याचा स्राव होतो. त्यामुळे मला जगण्यासाठी अन्न पाण्याची गरज लागत नाही. त्यांच्या भक्तांचा दावा आहे की, त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षापासून खाणं-पिणं वर्ज केलं होतं. जानी यांनी गुजरात जवळील एका वर्षावनात अंबाजी मंदिराजवळ आश्रम बनवलं होतं. तिथेच ते एका गुहेत ध्यान धारणा करायचे. 2010 साली इंस्टिट्यूट ऑफ फिजियोलोजी अॅंड अलाइड सायंसेस (डीआयपीएएस) च्या शास्त्रज्ञांनी आणि काही डॉक्टरांनी योगी जानी यांच्या दाव्याबाबत अभ्यास केला. 15 दिवस त्यांनी जानी यांचं निरीक्षण केलं होतं.  डीआयपीएएसकडून सांगण्यात आलं होतं की, भूक आणि पाण्यापासून वाचण्यासाठी ते काहीतरी अतिरेक करतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray : भारत De-Modi-Nation होणार,  उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी ABP MajhaGhatkopar Bhavesh Bhinde Arrested : घाटकोपर बॅनर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटकPalghar Rain Destruction: छप्पर उडालं,लेकरं उघड्यावर पडली.. अवकाळी पावसात संसार वाहून गेलाYavatmal Doctor Beats Woman : डोळ्यासमोर लेकचा तफडून मृत्यू, डाक्टराने आईच्या खानाखाली मारली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
माता न तूं वैरिणी! आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ
आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ; न्यायालयाकडून मिळाला न्याय
Embed widget